आदर्श शाळा महाराष्ट्र प्रकल्प निर्मिती -
2007 साली मिडियावरील वरिष्ठ मान्यवरांची प्रेरणादायी विचार व अनेक शिक्षण तज्ञांची शैक्षणिक विचार वाचून ह्याच काळात ग्रामीण भागातील प्राथमिक स्तरावर काम करत असतांना ,विद्यार्थांना तंत्रसमनव्य साधून त्यांना पाठयपुस्तका बरोबर इतर बाहेरील अवांतर वाचन संदर्भ शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी, अध्ययन-अध्यापनातील जगभरातील शिक्षण तज्ञांचे शैक्षणिक संशोधन व राज्यस्तरावर प्रत्येक्ष खालच्या स्तरावर होत असणारे काम यावर कृती संशोधन करून, तंत्रसमनव्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून विद्यार्थांसाठी आनंददायी, प्रभावी व परिणामकारक दर्जेदार अध्ययन व अध्यापन पद्धतीचा विकसासाठी व महाराष्ट्रच्या शिक्षण पद्धतीत तंत्रसमनव्य साधून विद्यार्थांसाठी नवीन शैक्षणिक विचार व कृती संशोधन तसेच शिक्षणात डिजिटल क्रांती निर्मितीसाठी कोल्हापूर जिल्ह्या येथे एका छोट्याशा वाड्या वस्तीवर असणारी ही शाळा विद्या मंदिर मालाईवाडा, केंद्र (येळवण जुगाई) ता. शाहूवाडी या शाळेत आदर्श शाळा ह्या ऑनलाईन प्रकल्पाची सुरवात करण्यात आली.
आदर्श शाळा या प्रकल्पावर काम करतांना सन-2004 व 2006 ह्या कालावधीत ग्रामीण भागातील विविध शाळेला भेटी देऊन, अनेक शाळेतील शिक्षकांची अध्ययन-अध्यापन पद्धती व शिक्षण शास्त्रात मांडलेले शिक्षण तत्वज्ञाची शैक्षणिक विचार व शाळेतील शिक्षकांची प्रत्येक्ष अध्ययन अध्यापनातील अनुभव ह्यांचे एकत्रित विचार आदर्श शाळा
https://adarshshala.blogspot.com/
ह्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
पुढे शासन स्तरावर सुद्धा 2008 मध्ये आदर्श शाळा योजना अंमलात आली. प्रती गट - एक शाळा या प्रमाणात बुद्धीमान ग्रामीण बालकांना दर्जेदार शिक्षण देता यावे, यासाठी उत्कृष्टतेचा मापदंड असणा-या आदर्श शाळा उभारणे, हा या योजनेचा उद्देश. ह्या शासनाच्या विविध योजनेचा फॉलो अप घेऊन राज्यातील हजारो शाळेतील शिक्षकांना ऑनलाईन भेटण्यासाठी त्यांचे उपक्रम कृती जाणून घेऊन त्यांना हवे त्या जागी तंत्रसमनव्य साधून शोसल ग्रुपवरून सहकार्य केल्या गेले. ह्यातील सोशल ग्रुप फेसबुकद्वारे महाराष्ट्रातील विविध शिक्षकांचे शैक्षणिक विचार, त्यांच्या अध्ययन-अध्यापन पद्धतीत व त्यांना तंत्रसमनव्य साधण्यासाठी विविध अध्ययन कृतीत त्यांना टेक्निकल सहकार्य आदर्श शाळा ह्या फेसबुक वरून करून अनेक शाळेचे स्वतंत्र फेसबुक पेज तयार करून देण्यात आले.
विविध शाळांचे टीम मनेजमेंट करून अनेक शिक्षकांच्या शैक्षणिक ग्रुपवरून त्यांचे स्वतंत्र प्रकप निर्मितीचे कार्य करता आले. शिक्षकांना विद्यार्थांसाठी ऑनलाईन शिक्षण कसे देता येईल? आपले अध्ययन-अध्यापन पद्धतीची दैनंदिन नोंद ठेवण्यासाठी ब्लॉगिंगचा वापर करण्यासाठी शिक्षकांना आदर्श शाळा ह्या ग्रामीण भागातील शाळा स्तरावर विकसित केलेल्या प्रकल्पाचे अनुकरण करण्यासाठी प्रेरणादायी दिशा देण्याचे कार्य करता आले. अनेक शाळेतील शिक्षकांना तंत्रसमनव्यसाठी विविध शैक्षणिक विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी फेसबुकचा वापर सुद्धा त्या काळात जास्त करण्यात आला.
https://m.facebook.com/adarsh.shala
महाराष्ट्र्स्तरावर एका लहान वाडे वस्तीवर काम करतांना या प्रकल्पा अंतर्गत जुळणारे सर्व शिक्षक बंधू भगिनींना त्यांच्या शाळेतील शैक्षणिक उपक्रमाला चालना देऊन तंत्रमनव्यतुन साधून त्यांचे शाळेतील विविध उपक्रम ऑनलाईन करण्यासाठी निस्वार्थपणे कार्य करता आले. या प्रकल्पातुन शैक्षणिक रिसर्च करता आले.
पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि शालेय प्रशासनासंदर्भात आदर्श भूमिका
निस्वार्थपणे ठेवून, राज्यभरातील शिक्षकांना डिजिटल क्रांतीसाठी प्रेरणादायी शैक्षणिक विचार आदर्श शाळा या प्रकल्पनातून मांडण्यात आले आहे. आजच्या काळात खूपछान आपले शिक्षक बंधू भगिनीं तंत्रसमनव्यातुन शैक्षणिक विचारांची देवाण घेवाण करत आहेत. खूप छान शैक्षणिक कार्य आपल्या महाराष्ट्र् स्तरावरून होत आहे .नमो सत्य, जयहिंद।
@webmaster